सुन्न गोठली हरेक सळसळ,
कुंद शांतता नीरव रानी -
रातराणीचा मंद श्वासही
बोचत होता पानोपानी...  

भल्या पहाटे शुक्रचांदणी
आभाळातून जळी उतरली,
झुळुक दोर अन नीर पाळणा
अंगाई मनी हळू उमटली!

(2011)

Comments

Popular posts from this blog

कडुलिंब