Posts

कडुलिंब

  दारी आईने लावले एक निंबोणीचे झाड रोमरोम त्याचे कडू परी छाया थंडगार बालपणीच्या स्वप्नाचे केले पुन्हयांदा रोपण दिनरात केले एक त्याची करत राखण दाट फांद्यांतून त्याच्या पाखरांचे किती थवे चिऊ, कोकिळा नि कधी भारद्वजही विसावे   गेले किती पावसाळे वृक्ष गगना भिडला त्याच्या सावली शी टेके आता सूर्यही ओशाळा! झाडामागे निंबोणीच्या झोपी चांदोमामा जाई परी खिडकीच्या पाशी रात-रात जागी आई कडुलिंबी सावलीत गार अंगण शोभते झाडापाशी आता आई फक्त घराला शोधते

The linguistics of emotions, bilingualism and multiple personalities, and tropes from Marathi pop culture

 I was listening to a Lingthusiasm episode on the linguistics of emotions , and the bit about how bilingual people process emotions stood out to me. A few months ago, I had an epiphany that how I feel and what language I write in are deeply intertwined. My journal entries in English are more businesslike, reflecting on things I should and should not do and planning my life. The tone is more of a to-do list meets pep talk to self. When I journal in Marathi on the other hand, my thoughts are  more meandering and laid-back. I came to the conclusion that the stage of life I learned these languages at and the contexts of use have trained me to access my thoughts differently in the two languages.  It's so cool to encounter actual data that relates to my experience! I had not considered the effect of how emotion space is mapped in different languages on what context-language pairings people lean towards in practice.  In the podcast, they discussed an example of a Russian-speaking person r

The Monster in My Head

It’s just another day. I have had tea with a lot of ginger, had a healthy lunch I packed in the morning, stressed over some little detail of my life, made dinner plans. It’s just another day. Except it’s not. I think I drank coffee after too long. Maybe I drank it too fast. Or maybe I didn’t blow-dry properly and walked out in the cold with three and a half molecules of water in my hair. Or maybe I added too much soy sauce in my noodles at lunch. And now there’s a little pulse of pain jumping all over my head.  Initially it’s just a distraction, like a bothersome faucet that won’t stop dripping every three seconds. Or a passing firetruck that gets louder and louder and louder and then fades out in the distance like it was never here. Or the weird hammer noise that the radiator sometimes makes. Except that that radiator is my head and there is an actual physical hammer banging on it. Plus that hammer can teleport from one point of my brain to another. Plus it can leave

I count my blessings

It must be 2004-2005. I am about ten years old. Mom and grandma are talking about an acquaintance. From the tidbits that I pay attention to while reading Harry Potter, I gather that this couple recently had a third female child while they were desperately wishing for a son. Apparently some ‘Baba’ has advised them to dress one of their girls as a boy. An image of a male child would ensure that the mother bears a son next time. They choose their second daughter, an eight-year old, for this purpose. My mom and grandma agree that this is insane and unacceptable, and the conversation ends there. I am twelve now. grandma is gossiping about that family again. The mother is pregnant, but ultrasound says it’s a girl. They are going to abort the child. They are giving up. Their daughter will go back to long hair and girly clothes. I must be around ten again. A friend who lives nearby is over to study with me on a Sunday afternoon. She is the fifth girl child in her family, with one younger

लाईट गेल्यावर...

पाऊस पडतोय वळवाचा. मग काय, लाईटपण गेलीये! (पुणेकर: तुमच्या 'शुद्ध ' भाषेत 'दिवे गेलेत.') आणि जाताना चांगला ' ढप्प-धम्म ' असा काहीतरी आवाजपण आलेला. म्हणजे लवकर परत यायचं लक्षण नाही. पण खरंतर खूप भारी वाटतंय माहितीए! मला अगदीच वेड्यात काढायच्या आधी त्याची कारणं ऐकून घ्या. अशी अचानक लाईट गेली ना, की  रातकिड्यांच्या आवाजाकडे लक्ष जायला लागतं. आजच्यासारखा पाऊस पडत असला तर मागच्या अंगणातली पन्हाळ्याच्या धारेची टपटप ऐकायला येते. टीव्ही बंद असतो ना, मग वारा  सुटल्यावर चंदनाची पानं  वेगळी सळसळ करतात आणि सिताफळाची वेगळी, हे पेटतं! मंद चंद्रप्रकाशात डोंगर-झाडांच्या आकृत्या लक्ष वेधून घेतात. संध्याकाळ निरभ्र असली तर आकाशातले तारे कधी नव्हे ते दिसायला लागतात, अगदी स्पष्ट! निरभ्र नसली, तर खराखरा संधिप्रकाश किती उशिरापर्यंत ढगांमध्ये खेळतो, याचं आश्चर्य वाटतं! आणि अंधार आणि शांतता असल्यामुळेच असले बघण्या-ऐकण्याचे साक्षात्कार होतात असं काही नाही! भास समजा पाहिजे तर, पण लाईट गेलेली असली तर आईच्या रोजच्याच फोडणीचा वास किती जास्त खमंग वाटतो म्हणून सांगू! पावसाळ्यातपण मात

लेखिकेचा ठोकळा (writer's block!)

ताज्या आल्याचा दरवळ चहाच्या वाफेवर उडत असतो. चहा परफेक्ट झाला की मातीचा वास का आठवतो? आणि सकाळी सकाळी अंगणात ऊन पडलं  की गरम भाकरी आणि गवारीच्या फोडणीचा वास येतो! अरे वा! भारीच कनेक्शन आहे की हे! पण ताज्या डहाळ्याच्या वासाने नदीवरचा फेरफटका का आठवतो? खोलात गेलं की असं होतं बघा. आता गावठी चाफा, कुंदा, घरगुती गुलकंद अशा वासांची मेडलीच होते डोक्यात! वासाची फुलं - रंगीत फुलं - गुलबक्षी, अबोली, कोरांटी - रांगोळीचे रंग - आकाशकंदील... सगळे वास आणि रंग मधली सुट्टी झाल्यासारखा मोकाट कल्ला करत सुटतात! कोपऱ्यात कुठेतरी काल रात्रीच्या दोन कोट्या स्वतःशीच खिदळत असतात, आणि साडेतीन यमकांचा 'ग्रुप' हातात हात धरून अजून अर्धं यमक शोधायला निघतो - - एक मिनिट - हा आवाज कसला? वहीची पानं?! क्षणार्धात डोक्यातल्या मजेदार कल्ल्याचा जाम गोंधळ उडतो.  रात्रभर हसत बसलेल्या कोट्यांचा स्वतःवरचाच विश्वास उडतो आणि खिदळणं एकदम बंद पडतं. यमकांचे हात सुटून ती एकेकटी गर्दीत हरवून जातात... आणि त्यांच्याबरोबर कधी पूर्णच न झालेली कवितापण. रंगांची आणि गंधांची हवेवरची नक्षी वावटळ आल्यासारखी उडून गायब हो
सुन्न गोठली हरेक सळसळ, कुंद शांतता नीरव रानी - रातराणीचा मंद श्वासही बोचत होता पानोपानी...   भल्या पहाटे शुक्रचांदणी आभाळातून जळी उतरली, झुळुक दोर अन नीर पाळणा अंगाई मनी हळू उमटली! (2011)