कितेक वेळा

कितेक वेळा मला वाटते तप्त अग्निची शिखा बनावे 
सौजन्याचे फोल मुखोटे पाचोळ्यागत जळून जावे 
उडून जावे राखोळीसम तोंडदेखले शब्द बेगडी 
सच्चाईच्या शीत सरींतून अन रानाने पुन्हा रुजावे!

कितेक वेळा मला वाटते बनून यावे उधाण वादळ 

दिल्या-घेतल्या सर्व ऋणांची उठवावी ही एक वावटळ 
सुकल्या-ओल्याशा घावांवर द्यावी मग झुळकीची फुंकर 
नाजूक-प्रांजळ हिरवी नाती पुन्हा फुटावी लेऊन अंकुर!

(August 2015)

Comments

Popular posts from this blog

The Monster in My Head