लहानपणी ना बाहेर फिरायला गेल्यावर मी randomly आईबाबांकडे कशाचातरी हट्ट धरणार. म्हणजे इरेलाच पेटणार अगदी. बऱ्याचदा तो हट्ट काहीतरी वेडगळच असायचा, अन मग मन रमवायला फुगाबिगा असलं काहीतरी अस्मादिकांच्या हातावर टेकवलं जायचं! मीपण सुरुवातीला थोडाफार आकांत करून मग त्या फुग्यात गुंतून जाणार. मग मुळात धरलेला हट्ट कुठला आठवायला? :D सगळ्यांच्याच लहानपणी होत असणार बहुदा असं.
अधेमधे ना मला असं काहीतरी फार भारी करायची इच्छा होते. म्हणजे असं 'हटके ', 'risky ' वगैरे. आणि असलं सगळं बोलून दाखवायची गुस्ताखीपण होतेच! मग काय, 'बिकट वाट वहिवाट नसावी धोपटमार्गा सोडू नको ' या सुरातली बरीच औषधं गपगुमान रिचवावी लागतात. माझं एवढुसं झालेलं तोंड बघून माझं future किती bright आहे, मी नाकासमोSS र चालले तर किती नावबिव कमावू शकते याची मला उजळणी करून दिली जाते. ते ऐकून थोडंफार बरंपण वाटतं! या सगळ्या 'अफलातून' कल्पना डोक्यात यायच्या बंदच होणारेत अशानं! लहानपणीच्या हट्टासारख्या या सगळ्या इच्छापण निरर्थक-बिनबुडाच्याच आहेत की काय? नाहीतर या 'bright future' च्या आमिषांत का गुंतायला होतंय? सगळ्यांच्याच विशीत होतं का हे असलं ?
पावसानं विझलेल्या शेकोटीचा वास घुमतोय डोक्यात...
(July 2014)
P. S.: गेल्या ३ वर्षांत डोक्यातल्या 'अफलातून' कल्पनांचं प्रमाण खरंच रोडावलंय. अजून काही वर्षांनी मीच अशा कल्पक डोक्यांना नाकासमोSSर चालायचे सल्ले देऊ लागेन अशी आता भीती वाटते!

Comments
Post a Comment