Posts

Showing posts from 2017

लेखिकेचा ठोकळा (writer's block!)

ताज्या आल्याचा दरवळ चहाच्या वाफेवर उडत असतो. चहा परफेक्ट झाला की मातीचा वास का आठवतो? आणि सकाळी सकाळी अंगणात ऊन पडलं  की गरम भाकरी आणि गवारीच्या फोडणीचा वास येतो! अरे वा! भारीच कनेक्शन आहे की हे! पण ताज्या डहाळ्याच्या वासाने नदीवरचा फेरफटका का आठवतो? खोलात गेलं की असं होतं बघा. आता गावठी चाफा, कुंदा, घरगुती गुलकंद अशा वासांची मेडलीच होते डोक्यात! वासाची फुलं - रंगीत फुलं - गुलबक्षी, अबोली, कोरांटी - रांगोळीचे रंग - आकाशकंदील... सगळे वास आणि रंग मधली सुट्टी झाल्यासारखा मोकाट कल्ला करत सुटतात! कोपऱ्यात कुठेतरी काल रात्रीच्या दोन कोट्या स्वतःशीच खिदळत असतात, आणि साडेतीन यमकांचा 'ग्रुप' हातात हात धरून अजून अर्धं यमक शोधायला निघतो - - एक मिनिट - हा आवाज कसला? वहीची पानं?! क्षणार्धात डोक्यातल्या मजेदार कल्ल्याचा जाम गोंधळ उडतो.  रात्रभर हसत बसलेल्या कोट्यांचा स्वतःवरचाच विश्वास उडतो आणि खिदळणं एकदम बंद पडतं. यमकांचे हात सुटून ती एकेकटी गर्दीत हरवून जातात... आणि त्यांच्याबरोबर कधी पूर्णच न झालेली कवितापण. रंगांची आणि गंधां...
सुन्न गोठली हरेक सळसळ, कुंद शांतता नीरव रानी - रातराणीचा मंद श्वासही बोचत होता पानोपानी...   भल्या पहाटे शुक्रचांदणी आभाळातून जळी उतरली, झुळुक दोर अन नीर पाळणा अंगाई मनी हळू उमटली! (2011)

The pieces of my soul...

Just Caught myself thinking of Horcruxes. One of the most sinister concepts from my beloved fantasy-land. They say only the darkest of souls can tear itself to pieces. They say you have to take a life, every time you do that. Yet, here I am, at my apartment in Evanston, at the dead of the night, And at the same time in Afghanistan, a land I've never seen but always wondered about, through a paperback, And also on a train, somewhere between Bhubaneshwar and Kolkata, as a travel companion to one of my closest friends. At times like these, I'm glad I never got my Hogwarts letter. Scattered all over worlds real and fantastic, the places I've travelled personally and vicariously, at the train stations and airports and hostels and airbnbs, and with all my dear,  dear friends... my soul has become such a gorgeous mess! And without taking a single life! Except my own, over and over again, while leaving them behind, saying goodbyes...  
लहानपणी ना बाहेर फिरायला गेल्यावर मी randomly  आईबाबांकडे कशाचातरी हट्ट धरणार. म्हणजे इरेलाच पेटणार अगदी. बऱ्याचदा तो हट्ट काहीतरी वेडगळच असायचा, अन मग मन रमवायला फुगाबिगा असलं काहीतरी अस्मादिकांच्या हातावर टेकवलं जायचं! मीपण सुरुवातीला थोडाफार आकांत करून मग त्या फुग्यात गुंतून जाणार. मग मुळात धरलेला हट्ट कुठला आठवायला? :D सगळ्यांच्याच लहानपणी होत असणार बहुदा असं.  अधेमधे ना मला अ सं काहीतरी फार भारी करायची इच्छा होते. म्हणजे असं 'हटके ', 'risky ' वगैरे. आणि असलं सगळं बोलून  दाखवायची गुस्ताखीपण होतेच! मग काय, 'बिकट वाट वहिवाट नसावी धोपटमार्गा सोडू नको ' या सुरातली बरीच औषधं गपगुमान रिचवावी लागतात. माझं एवढुसं झालेलं तोंड बघून माझं future  किती bright आहे, मी नाकासमोSS र चालले तर किती नावबिव कमावू शकते याची मला उजळणी करून दिली जाते. ते ऐकून   थोडंफार बरंपण  वाटतं! या सगळ्या 'अफलातून' कल्पना डोक्यात यायच्या बं दच होणारेत अशानं! लहानपणीच्या हट्टासारख्या या सगळ्या इच्छापण निरर्थक-बिनबुडाच्याच आहेत की काय? नाहीतर या 'bright futu...
मन तृषार्त चातक, मन चकोर विरही  तू रे पुनवेचा चांद कुट्ट ढगाळल्या राती  परी खुळावते जिवा तुझी लावून चाहूल  वेडे वादळ श्वासांचे अन गात्रांत भरती! (November 2016)  

कितेक वेळा

कितेक वेळा मला वाटते तप्त अग्निची शिखा बनावे  सौजन्याचे फोल मुखोटे पाचोळ्यागत जळून जावे  उडून जावे राखोळीसम तोंडदेखले शब्द बेगडी  सच्चाईच्या शीत सरींतून अन रानाने पुन्हा रुजावे! कितेक वेळा मला वाटते बनून यावे उधाण वादळ  दिल्या-घेतल्या सर्व ऋणांची उठवावी ही एक वावटळ  सुकल्या-ओल्याशा घावांवर द्यावी मग झुळकीची फुंकर  नाजूक-प्रांजळ हिरवी नाती पुन्हा फुटावी लेऊन अंकुर! (August 2015)
मज    दूर  तटाची चाड नसो वा अथांगतेचा  दंभ नको, बस चंद्राच्या नजरेत नजर अन मनात जळती आग बरी, न बोजा हो  मज  मोत्यांचा, आगबोटींची कसली पर्वा? मी लाट स्वैर अन  मज मधली या एक क्षणाची प्यास खरी! (2012)